Devaraai

/ Vivek Kale Nature Photography
 

 
 


 

देवराई
Sacred Groves
March 2013
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
देवराई चे संवर्धन महत्वाचे आहे का ? देवराई म्हणजे नक्की काय ?, काय असत बर या देवराईत ? त्याचा काय फायदा असतो ? असे असंख्य प्रश्न मनात येतात. चला तर आढावा घेउयात देवराईचा. पुरातन काळात युरोप, अमेरिका, आशिया व अफ्रिकेत सर्वत्र खुप देवराई होत्या. हिंदु, इस्लाम, ख्रिस्ती व इतर धर्मांचा जन्म झाला नव्हता. दुर्गम व खडतर भागातुन संपन्न भागाकडे माणसाने स्थलांतर करणे चालु केले होते. नवीन गाव वसली. गाववस्ती जवळच त्याने शेती करणे चालु केले.
शेतीसाठी जमीनीची त्याने मशागत केली. त्यासाठी जंगलतोड झाली. जसजशी लोकसंख्या वाढु लागली तशी जंगलतोड वाढली. माणसाने जंगलाचा वापर आपल्या गरजा भागवण्यासाठी केला. तो जंगलातली फुले, फळे, लाकुड, वनौषधी, शिकार, मध व इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी करु लागला. या पुरातन काळात माणसाने निसर्गाशी समतोल साधला. जंगल राखुन त्याने शेती, गाव यांचा विकास केला.
 

 

 
Sacred Grove, North western ghats, India
 
बहुतेक जगात या काळात, माणसाने निसर्गाकडे देव म्हणुन पाहिले. एखादी जीवन दायी नदी, दुष्काळात फळ देणारी झाडे, वारुळ, डोंगर, गुहा, पाणवठे, आणी कधी संपुर्ण जंगल असे निसर्ग घटक माणसाने देव म्हणुन पुजले. लोकमानसातुन निसर्ग देवाची संकल्पना तयार झाली.नविन धर्मांच्या उत्पत्ती बरोबर मात्र या देवांच्या संकल्पना बदलल्या. धर्मांची संकल्पना बदलल्यामुळे जगभर निसर्ग देवता लुप्त होऊ लागली.
हिंदु धर्माच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. हिंदु धर्माच्या प्रसारादरम्यान, मुळ निसर्ग देवतेच्या संकल्पनेस खोडुन न काढता धर्मात समाविष्ट करण्यात आले. मुर्तिपुजा सुरु झाली. जंगलातील निसर्गदेवते बरोबर, भैरोबा, सोमजाई, महादेव, वाघजाई अश्या विविध मुर्तिदेवांची पुजा होऊ लागली. आज सुद्धा बऱ्याच गावांमध्ये निसर्ग घटकांना देव मानले जाते.
 

 

 
Bhairavanath temple, Sacred groove, north western ghats, Pune district, Maharashtra, India
 
कालांतरात देवाचे हे जंगल लहान होत गेले. बराच कालावधी माणसाने हे लहानसे देवराईचे जंगल राखले. सार्वजनीक वापर असल्यामुळे देवराईत नियम व पायंडे पडत गेले. आज मात्र आपण निसर्गदेवता, व हिंदु देवता, संकल्पनेपासुन सुद्धा हळुहळु दुर जात आहोत.
पाश्चिमात्य जीवनपद्धती, ओद्योगिकरण, व व्यापारीकरणामुळे आज आपण आपला देव नकळत बदलत आहोत. अर्थशास्त्र व निगडीत संकल्पनेमुळे उरल्या सुरक्या देवराई नष्ट होत आहेत. एकविसाव्या शतकात याचा वेग वाढत चाला आहे. आजकाल अभ्यासकांना मात्र या देवराईत माणसाच्या जुन्या निसर्ग समतोल प्रगतीचा धागा सापडतो आहे असे वाटु लागले आहे.
 

 

 
Bhairavanath temple, Sacred groove, north western ghats, Pune district, Maharashtra, India
 
महाराष्ट्रात पश्चिम घाटात, सह्याद्रीत, कोकणात, घाटमाथ्यावर, सातपुडयात, देशावर सर्वत्र देवराई होत्या. आज देवराईंची संख्या रोडावली आहे. अहुपे, भीमाशंकर, बनेश्वर, आजिवली व अशा अनेक देवराई पुण्याजवळ आहेत. देवराई म्हणजे देवांसाठी राखीव ठेवलेले पवित्र वन होय. येथे प्राण्यांची शिकार, वृक्षतोड यावर निर्बंध असतात. गावातल्या लोकांचे या देवराईला संरक्षण असते. देवराईत त्या भागातील मुळ वनस्पती, वन्यजीव, अशा सर्व निसर्ग घटकांना संरक्षण मिळते.
य़ा श्रद्धेमुळे, देवराईत बऱ्याच घटकांचे जतन झाले आहे. येथील वृक्ष खुप उंच झालेले दिसतात. काही देवराईत ३० मीटर पर्यंत विशाल वृक्ष आजही पहावयास मिळतात. बाह्य जगात लुप्त झालेल्या वनस्पती काही देवराईत आढळतात. देवराईत विविध फुलपाखरे, किटक, पक्षी, प्राणी यांचे आश्रयस्थान आहे. देवराईत वनौषधी व इतर उपयोगी वनस्पती आढळतात. आजही या देवराई आपल्या पोटात अनेक दुर्मिळ औषध सांभाळुन आहेत.
 

 

 
Bhairavanath temple, Sacred groove, north western ghats, Pune district, Maharashtra, India
 
वाढत्या लोकसंख्येमुळे गाववस्त्या मोठया झाल्या. गरजेपोटी शेती साठी जंगले तोडली गेली. बऱ्याच ठिकाणी जंगले समुळ नष्ट झाली. जंगलांचे देवराई पुंजके राहिले. अर्थशास्त्राच्या नवीन नियमावली बरोबर माणसाने प्रगतीचा ध्यास घेतला. गावागावात वीज, पाणी, शाळा, दवाखाने, रस्ते पोहोचले. ग्रामीण जीवनाच्या कायापालट झाला. त्या बरोबर तेथील रुढी, परंपरा बदलु लागल्या.
अर्थकारणाच्या नवीन देवेतेमुळे, वनदेवतेची संकल्पना अजुनच मागे पडली. शासन व्यवस्थेने जंगलांच्या संरक्षणाचे काम आपल्या हाती घेतले. गाव व जंगल यांच्यात दुरावा निर्माण झाला. नवीन नियमावली बनवण्यात आली. आपल्या उपजीविकेसाठी जंगलाकढे बघणाऱ्या गावकऱ्यांसमोर, शहरांकडे स्थलांतर, व्यापारीकरणामुळे जमिन विक्री असे पर्याय उभे राहिले.
 
 
Old wooden instruments, Sacred grove temple ,Pune district, north western ghats, Maharashtra, India
 
रस्ता रुंदीकरण, व्यावसायिक नवीन खाजगी शहरीकरण, गरजेच्या वस्तुंची सहज उपलब्धता, लाकुड्तोड, वनौषधींचे व्यापारीकरण, निसर्ग पर्यटन व इतर कारणांमुळे पारंपारिक देवराईला उतरती कळा लागली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे, त्यात दुखावलेल्या मनांचा पुन्हा निसर्गाकडे ओढा वाढु लागला आहे.
नैसर्गिक घटकांचा वाढता तुटवडा, अभ्यासकांना पुन्हा देवराई कडे घेऊन जात आहे.या व इतर कारणांमुळे देवराई संरक्षणाचा प्रयत्न होत आहे. निसर्गाकडे ओढ असलेल्या प्रत्येकाने अशा उपक्रमास हातभार लावला, तर देवराई चा ठेवा वाचेल. समाजात निसर्गाशी समतोल राखण्याचा बाणा रुजेल.
 


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.